Biyane Tapasni 2025 खरीप हंगाम जवळ आला की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते. उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी बियाण्यांची निवड हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो.

अनेकदा शेतकरी बांधव दरवर्षी बाजारातून नवे बियाणे खरेदी करतात. परंतु हे बियाणे महाग असतानाही त्याची उगवण क्षमता कितपत योग्य आहे, हे निश्चित नसते.
यंदा शेतकऱ्यांच्या पसंतीत कपाशी, सोयाबीन, मका पिकांत कोण राहणार अव्वल कोण दुय्यम, वाचा सविस्तर;
अशावेळी वेळ, श्रम आणि पैसा वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळे उगमन क्षम बियाणे वापरणे हा खरीप यशस्वी करण्याचा मूलमंत्र ठरतो.

Biyane Tapasni 2025 गोणपाट वापरून बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी करावी?
बियाण्यांच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढा, सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र भरून घ्या.
गोणपाट सहा चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुवुन घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवा.
पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट 100 दाणे मोजून दीड-दोन सें.मी. अंतरावर (बोटाचं एक कांड अंतरावर) 10-10 च्या रांगेत गोणपाटाच्या तोड्यावर ओळीत ठेवावे अशाप्रकारे 100 दाण्यांचे 3 नमुने तयार करावे.
Biyane Tapasni 2025 गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व बियाण्यांवर दुसरा गोण पाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी मारावे.
गोण पाटाच्या तुकड्याची बियाण्यांसकट गुंडाळी करून थंड पाणी सावलीत ठेवा त्यावर अधून-मधून पाणी शिंपडून ओले ठेवा.
6-7 दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरून उघडा चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा तीनही गुंडाळ्यांची सरासरी काढून 100 दाण्यांपैकी 70 किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाण्यांसारखेच गुणवत्तेचे आहे असे समजा आणि शिफारशी प्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरा.
जर उगवण झालेल्या बियाण्यांची सरासरी संख्या 70 पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्याचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करा.
पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशकांची व जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया करण्यास विसरू नका.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |