राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान…! Avkali Nuksan 2025

Avkali Nuksan 2025 मुंबई : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रसह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात हळद, आंबा, पपई, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Avkali Nuksan 2025

जालना जिल्ह्यात विज पडून एका तरुणाचा तर नाशिक मध्ये झाड अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. बीड शहरातील पोलीस पेट्रोल रंगाचे छत कोसळल्याने दोघे जखमी झाले.

राज्यात पुढील दोन दिवस या भागात मेघर्जनेसह पाऊस व गारपीटीची शक्यता!

Avkali Nuksan 2025 वीज पडल्याने भाटेपूरी (ता. जालना) येथील विठ्ठल गंगाधर कावळे (24) या युवकाचा मृत्यू झाला. बीड, छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला.

WhatsApp Group Join Now

धाराशिव जिल्ह्यात भूम शहर व परिसरात काही ठिकाणी गारा पडल्या. उमरगा तालुक्यात येणेगुर येथे प्रवासी ऑटोवर वादळी वाऱ्यात वीज वाहिनी कोसळली. यात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.

Avkali Nuksan 2025 अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कोरडगाव येथील आसना नदीला पूर आला.

नाशिकमध्ये ही सलग दुसऱ्या दिवशी तासभर मुसळधार पाऊस झाला. झाड दुचाकी वर कोसळल्याने गौरव भास्कर रिपोटे (21, रा. देवळाली गाव) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर शहरातील सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Avkali Nuksan 2025 पुढील दोन दिवस पावसाचे

  • राज्यात पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
  • पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, धाराशिव येथे मंगळवारी विजांच्या कडकडाट असा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment