राज्यातील ‘या’ जिल्ह्याला मिळाला खरिपाचा 159 कोटींचा पिक विमा, वाचा सविस्तर; Kharip Pik Vima 2025

Kharip Pik Vima 2025 गेल्या सहा महिन्यापासून मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोटी रुपयांची पिक विमा नुकसान भरपाई मिळाली आहे.

Kharip Pik Vima 2025

जवळपास बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून यंदाच्या खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला या मदतीने आणखी चालना मिळाली आहे.

सोलापूर जिल्ह्याला प्रथमच मिळाली नुकसान भरपाईची कोटी रक्कम; 2 लाख 39 हजार शेतकऱ्यांना लाभ!

पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेतून गेल्या हंगामात पुणे विभागाला 283 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानुसार या 283 कोटींपैकी अहिल्यानगर जिल्ह्याला 159 कोटी 21 लाख 54 हजार रुपये मंजूर केले होते.

WhatsApp Group Join Now

त्यात नेवासा तालुक्यातील 31 हजार 44 हेक्टर क्षेत्रावरील पिकाच्या नुकसानी पोटी 44 हजार 243 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 46 कोटी 52 लाख 21 हजार 338 रुपये मंजूर झाले होते. त्यातील 90 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.

Kharip Pik Vima 2025 जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात गेल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या 3 हजार 842 हेक्टर क्षेत्रावरील पिकाच्या नुकसानी पोटी 6 हजार 757 शेतकऱ्यांना 1 कोटी 62 लाख 27 हजार 584 नुकसान भरपाई मिळाली आहे.

Kharip Pik Vima 2025 त्या व्यतिरिक्तही स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून ही वरील दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लाभ हा नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला आहे.

Kharip Pik Vima 2025 तालुका : मिळालेली रक्कम

WhatsApp Group Join Now
जामखेड70476058
कर्जत14189033
पारनेर8035323
पाथर्डी136940272
श्री गोंदा62655439
अकोले7701616
कोपरगाव106280313
अहिल्यानगर44741576
नेवासा465221338
राहता71356908
राहुरी170412691
संगमनेर18175222
शेवगाव315378770
श्रीरामपूर100589864

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना 46 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या रकमेचे पीक विमा नुकसान भरपाई मिळाली. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल. – धनंजय हिरवे, तालुका कृषी अधिकारी, नेवासा”.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment