Job Card 2025 सध्या महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये घरुकुल योजनेतून घरे बांधण्याचे कामे सुरू आहेत. शिवाय पंतप्रधान घरकुल योजनेसाठी दुसरा टप्पा देखील सुरू झाला आहे. जर तुम्हाला हे घरकुल योजनेसाठी फॉर्म भरायचा असल्यास जॉब कार्ड आवश्यक असते. ते जॉब कार्ड कसे काढायचे? हे आजच्या भागातून जाणून घेऊयात….

सर्वप्रथम जॉब कार्ड काढण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल आणि तेथे अर्ज करावा लागेल. अर्ज भरताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि माहिती द्यावी लागेल.
पावसाचा प्रत्येक थेंब साठवा, यंदा वैयक्तिक शेततळे योजनेसाठी भरघोस निधी!
Job Card 2025 या ठिकाणी आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि जॉब कार्ड चा फॉर्म लागेल. या जॉब कार्ड वरील माहिती भरल्यानंतर ग्राम रोजगार सेवकाकडे हा फॉर्म जमा करावा. यानंतर काही दिवसांनी जॉब कार्ड चा नंबर दिला जातो.
WhatsApp Group
Join Now

Job Card 2025 जॉब कार्डचा नंबर मिळाल्यानंतर ते डाऊनलोड कसे करायचे, ते पाहूया…..
- सर्वप्रथम खाली दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.
- या ठिकाणी Generate Reports या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर दिलेल्या राज्यांपैकी आपले राज्य निवडा. (उदा. महाराष्ट्र)
- पुढील व्हिडिओमध्ये काही पर्याय दिले असतील. जसे वर्ष, तालुका, ब्लॉक, पंचायत.
- ही सर्व माहिती भरल्यानंतर Proceed या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर एक नवीन पेज उघडेल, यात अनेक पर्याय दिसतील. यातील R1 जॉब रजिस्ट्रेशन (R1 job Registration) या कॉलम मध्ये जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर (Job Card/ Employement Register) यावर क्लिक करा.
- त्यात तुमच्या गावातील जॉब कार्ड बनवलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांचे जॉब कार्ड नंबर दिसेल.
- त्यात तुमचे नाव शोधा. तुमच्या नावासमोर तुमचा जॉब कार्ड नंबर दिसेल. तो तुम्ही सुरक्षितपणे लिहून ठेवा.
- तसेच ते कार्डही डाऊनलोड करत येईल.
अधिकृत लिंक | https://nrega.nic.in/homegp_new.aspx |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |