राज्यात ‘सीसीआय’ ने केली दीड कोटी क्विंटल कापसाची खरेदी; 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 11 हजार 600 कोटी रुपयांचे वाटप! CCI Kapus Khredi 2025

CCI Kapus Khredi 2025 भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून 2024-25 या गत हंगामात राज्यातील 121 शासकीय केंद्रांच्या माध्यमातून तब्बल एकूण 1 कोटी 56 लाख 39 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, या पोटी 11 हजार 660 कोटी रुपयांचा संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक 22 लाख क्विंटल कापसाची खरेदी अकोला जिल्ह्यात करण्यात आली आहे.

CCI Kapus Khredi 2025

मागील हंगामात अनेक दिवस खुल्या बाजारात हमीभावाच्या दरम्यान कापसाचा भाव होता. त्यामुळे सीसीआयला कमी कापूस मिळाला होता; मात्र यंदा सुरुवातीपासूनच खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने चांगला कापूस मिळाला.

खरीप हंगामाची जोरदार तयारी ‘या’ जिल्ह्यात अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे लक्ष्य!

कापूस खरेदी केंद्रात कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याने मधल्या काळात काही दिवस सीसीआयने कापूस खरेदी बंद केली होती. यावर्षी मात्र 21 मार्चपर्यंत सीसीआयने कापूस खरेदी केली आहे. लांब धाग्याच्या कापसासाठी 7 हजार 521 रुपये तर मध्यम भागासाठी 7 हजार 121 हमीभाव देण्यात आला. राज्यात विदर्भ, मराठवाडा खान्देशमध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

WhatsApp Group Join Now

CCI Kapus Khredi 2025 छत्रपती संभाजी नगर विभागात 54 लाख 46 हजार क्विंटल खरेदी

600 केंद्र छत्रपती संभाजी नगर विभागात आहे. त्यानुसार विभागात 54 लाख 46 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

7850 रुपये सर्वाधिक मिळाला बाजार भाव

CCI Kapus Khredi 2025 नवीनतम बाजारभावानुसार, महाराष्ट्रात कापसाचा सरासरी भाव 7 हजार 675 रुपये प्रतिक्विंटल राहिला. या हंगामात सर्वात कमी बाजार भाव 7 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल तर सर्वाधिक दर 7 हजार 850 रुपये क्विंटल मिळाला आहे. असे असले तरी सर्वाधिक दरवाढीचा अल्प शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now

सीसीआयची राज्यातील कापूस खरेदी (लाख क्विंटलमध्ये) व रक्कम वाटप (कोटीत) छत्रपती संभाजी नगर विभाग

जिल्हाकापूस खरेदीरक्कम
छत्रपती संभाजी नगर7.18 531
जालना8.72645
परभणी13.721018
बीड6.77500
हिंगोली1.80134
नांदेड2.90215
जळगाव4.70347
नंदुरबार2.99222
धुळे3.74277
अहिल्यानगर2.94217

CCI Kapus Khredi 2025 अकोला विभाग

जिल्हाकापूस खरेदीरक्कम
अकोला221676
अमरावती13950
बुलढाणा8.5625
चंद्रपूर12.5846
गडचिरोली0.2820
नागपूर1.5113
वर्धा8.55647
वाशिम13.601114
यवतमाळ211563
एकूण156.391660

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment