Jamin Mojani 2025 पुणे : राज्यात गेल्या चार महिन्यात भूमी अभिलेख विभागाने सुमारे 70 हजार मोजण्या पूर्ण केल्या आहेत. त्यात सर्वाधिक 26 हजार 693 मोजण्या पुणे विभागात पूर्ण करण्यात आल्या.

राज्यातील 358 पैकी 255 तालुक्यांमध्ये मोजणीसाठी केवळ 60 दिवसांचा कालावधी लागत आहे, तर 50 तालुक्यांमध्ये हा कालावधी 90 ते 120 दिवस असून, तो कमी करण्यासाठी ज्यादा कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती भूमी अभिलेख उपसंचालक (भूमापन) कमलाकर हट्टेकर यांनी दिली.
संपूर्ण राज्यातील 2,997 जल प्रकल्पांत आता अवघे 33 टक्केच पाणी शिल्लक; 3015 गावे, वाड्यांची तहान टँकरवर;
राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये मोजण्याची संख्या जास्त असल्याने अन्य विभागातून 32 कर्मचाऱ्यांनी दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश आहे.

Jamin Mojani 2025 राज्यात 31 डिसेंबर अखेर एकूण 88 हजार 24 जमीन मोजणी प्रकरणे शिल्लक होती. त्यापैकी 31 मार्च अखेर 63 हजार 14 मोजणी पूर्ण झाली आहे.
हे काम एकूण प्रकरणांच्या सुमारे 72 टक्के आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात मोजणी प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
मात्र, नागपूर गोंदिया समृद्धी महामार्ग यवतमाळ येथील शक्तीपीठ महामार्ग तसेच नगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर या दोन तालुक्यांमध्ये मोजण्यात अंत्री कारणास्तव रखडल्या होत्या.
त्यामुळे 7 मे पर्यंत 69 हजार 279 अर्थात 79 टक्के मोजण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित 18 हजार 745 प्रकरणे लवकरच निकाल काढण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती हट्टेकर यांनी दिली.
Jamin Mojani 2025 जमिनीच्या मोजणीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या ई-मोजणी ‘व्हर्जन 2’ मुळे मोजणीला वेग आला आहे. एकट्या मार्च महिन्यात राज्यात तब्बल 39 हजारांहुन अधिक विक्रमी मोजणी झाल्या आहेत. हा आजवरचा विक्रम आहे.
Jamin Mojani 2025 राज्यामध्ये झालेली मोजणी
विभाग | जमीन मोजणी | शिल्लक मोजणी |
पुणे | 26,693 | 8,401 |
कोकण | 8,562 | 878 |
नाशिक | 9,297 | 3,795 |
संभाजीनगर | 8,604 | 3,151 |
अमरावती | 8,564 | 2,381 |
नागपूर | 7,559 | 131 |
एकूण | 69,279 | 18,745 |
” जमीन मोजणीचा सरासरी कालावधी कमी करण्यासाठी राज्यस्तरावरून दररोज आढावा घेतला जात आहे. एका भूकरमापकाला महिन्यात सरासरी 15 दिवस प्रत्यक्ष मोजणी करण्यात बंधन घातले आहे. त्यामुळे हे साध्य करण्यासाठी प्रत्येक भूकरमापक प्रत्यक्ष मोजणीला गेला किंवा नाही याची तपासणी होते. त्यामुळे मोजण्यांचा वेग वाढला असून, नागपूर, जळगाव, ठाणे, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, रायगड या जिल्ह्यांमध्ये जमीन मोजणी 60 दिवसातच होत आहे. – कमलाकर हट्टेकर उपसंचालक (भूमापन), भूमी अभिलेख विभाग, पुणे”
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |