Dudh Anudan 2025 राहता : गेल्या वर्षातील एकूण सहा महिन्यात प्रति लिटर 5 व 7 रुपये अनुदान काही दूध उत्पादकांना मिळाले, काही उत्पादकांना काही महिन्यांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही.

ग्रामीण भागातील गावागावातील शेतकरी आपले कुटुंब दूध व्यवसायावर चालवतात. मात्र, अनुदान न आल्याने ही कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.
वादळी वाऱ्यासह अर्धा तास गारपीट झाली, आणि सगळी पिकं पाण्याखाली गेली!
Dudh Anudan 2025 दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2024 मध्ये दुधाला कवडीमोल भाव मिळत होता. त्यामुळे राज्य सरकारने जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यात प्रति लिटर 5 रुपये अनुदान तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात प्रति लिटर 7 रुपये अनुदान घोषित केले.

काही दूध उत्पादकांना काही मिळण्याचे अनुदान मिळाले तर काही उत्पादकांना काही महिन्यांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही.
Dudh Anudan 2025 महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात शासनाने प्रतिलिटर सात रुपये प्रमाणे अनुदान घोषित केले होते. यातील काही उत्पादकांना एकाही महिन्याचे अनुदान मिळाले नाही. थकीत अनुदान कधी मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Dudh Anudan 2025 ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न आहे. आणि तरुण दुधाळ जनावरे पाळून आपला उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करतात. भाव नसताना घोषित केलेल्या अनुदानाला विलंब होत असल्याने दूध उत्पादक निराश आहेत.
“ मला ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यातील प्रति लिटर सात रुपये तसेच मागील चार महिन्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचे पाच रुपये अनुदान मिळालेले नाही. आमचा संसार प्रपंच दुधावर अवलंबून आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर वर्ग करावे. – बाळासाहेब घोरपडे, दूध उत्पादक, केलवड “
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |