खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून गोड क्रूरता! वाचा सविस्तर; Pik Vima 2025

Pik Vima 2025 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीन, मूग, कपाशी, तुर यांसारख्या पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत वेळेवर क्लेम दाखल केला.

Pik Vima 2025

मात्र, सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर केवळ 2,100 रुपयांची भरपाई देऊन विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप होत आहे. भरपाई न मिळाल्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

राज्यात ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता!

खारपान पट्ट्यातील चोहोटा बाजार व दहीहंडा मंडळाअंतर्गत येणाऱ्या केळीवेळी, धारेल, गिरजापुर, जऊळखेड, काटी, पाटी या गावातील शेतकऱ्यांना 2024 ला सालामध्ये चार वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले.

WhatsApp Group Join Now

केळीवेळी परिसरातील शेती ग्रामदानात आल्यामुळे येथे मागील दोन वर्षापासून फक्त 25 टक्केच नुकसान भरपाई मिळते. मात्र, यावर्षी ती देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.

Pik Vima 2025 विमा कंपनीकडून अपूर्ण भरपाई

  • सोयाबीन पेरणीसाठी एकरी किमान 10,000 खर्च येतो.
  • त्यामध्ये बियाणे, खत, औषध, मशागत व इतर प्रक्रियेचा समावेश होतो.
  • मात्र, केवळ 2100 इतकी भरपाई देण्यात आलेले शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.

Pik Vima 2025 काही ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम कमी ठेवून कंपनीने शेतकऱ्यांचे खिल्ली उडवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर क्लेम केला असूनही भरपाई पासून वंचित ठेवले गेले आहे, तर जे शेतकरी क्लेम करू शकले नाहीत, त्यांना एक रुपयाही भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

WhatsApp Group Join Now

काटी शिवारात सोयाबीन मूग व उडीद पिकाचा विमा घेतला होता. सर्वेही झाला; परंतु भरपाई काही मिळालेली नाही. शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. – अतुल चहाटे शेतकरी काटी “

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment