Maharashtra Water Storage Update 2025 राज्यातील मोठे, मध्यम व लघु अशा 2 हजार 997 सिंचन प्रकल्पात अवघा 33.37 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून, एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळी आणखी खालवली जाण्याची शक्यता आहे.

19 जिल्ह्यातील 758 गावे व 2,257 गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 57 शासकीय आणि 879 खासगी ट्रॅक्टरसद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मार्च महिन्यापासूनच जलसंकट निर्माण झाले असून, एप्रिल महिन्यात पाणीटंचाईच्या झळा बसल्या.
खरीप पिक विम्याचे 3,265 कोटी शासनाने केले मंजूर; ‘या’ जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी!
त्यात तापमान चाळिशीपार गेले आहे. प्रकल्पातील पाणी पातळी देखील कमी होत चालली आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच सूर्य आग ओकत आहे. परिणामी प्रकल्पातील पाणी पातळी अधिक कमी होईल, हे स्पष्ट आहे.

Maharashtra Water Storage Update 2025 कोणत्या प्रकल्पामध्ये किती पाणी साठा?
| मोठे प्रकल्प | 138 | 31.97 टक्के |
| मध्यम प्रकल्प | 260 | 40.29 टक्के |
| लघु प्रकल्प | 2,599 | 33.81 टक्के |
Maharashtra Water Storage Update 2025 विभागनिहाय जलसाठा
| विभाग | प्रकल्प | जलसाठा |
| नागपूर | 383 | 35.70% |
| अमरावती | 264 | 43.61% |
| छत्रपती संभाजी नगर | 920 | 32.77% |
| नाशिक | 537 | 37.52% |
| पुणे | 720 | 26.86% |
| कोकण | 173 | 41.22% |
Maharashtra Water Storage Update 2025 कुठे किती टँकर?
राज्यातील 19 जिल्ह्यात ट्रॅक्टर्स ने आणि पुरवठा सुरू आहे. त्यात ठाणे 47, रायगड 30, पालघर 28, नाशिक 90, अहिल्यानगर 8, पुणे 69, सातारा 66, सांगली 18, सोलापूर 19, छत्रपती संभाजी नगर 245, जालना 101, परभणी 1, धाराशिव 2, अमरावती 20, वाशिम 4, बुलढाणा 38, यवतमाळ 15 तर नागपूर जिल्ह्यात 15 टँकर लावण्यात आले आहे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |