Maharashtra Weather Update 2025 राज्यात मे महिन्याची सुरुवात होताच पावसाने हजेरी लावली आहे. पावसासाठी पोषक अशी वातावरण निर्मिती झालेली आहे. तर सोमवारी (5 मे) रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण भागापासून मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या तीन दिवसात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
मागील आठ वर्षात कापसाची लागवड कशी राहिली? जाणून घ्या सविस्तर;
मुंबईत देखील 6 ते 8 मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील बहुतांश भागांमध्ये दिवसा काहीच ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटून पावसाच्या तुरळकरींची बरसतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update 2025 राज्यात तीन दिवस पावसाचे?
राज्यातील काही ठिकाणी कमान तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पार गेला असतानाच पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.
मुंबईत ही 6 आणि 7 मे रोजी पावसाची शक्यता आहे. 5 ते 7 मे दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अवकाळी बरोबर गारपीटीची शक्यता आहे.
अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर मध्ये 6 व 7 मे मराठवाड्यात 7 मे, विदर्भात 5 मे रोजी अवकाळी बरोबर गारपीटीची शक्यता आहे तर दुसरीकडे कोकण 34 ते 35 अंश सेल्सिअस तर विदर्भात 42 ते 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.
उष्णतेच्या झाडांनी विविध जिल्ह्यात नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. घराबाहेर पडताना धडकी भरेल एवढे तापमान राज्यघट नोंदवले जात आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम दिसून येत आहेत.
Maharashtra Weather Update 2025 शेतकऱ्यांना सल्ला
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणिस असलेल्या पीक, फळाची व भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षितपणे साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |