वादळी वाऱ्यासह अर्धा तास गारपीट झाली, आणि सगळी पिकं पाण्याखाली गेली! Avkali Pavus 2025

Avkali Pavus 2025 पारनेर : पारनेर तालुक्यातील तिखोल, वनकुटे या परिसरात सोमवारी दुपारी 3.30 ते 4 दरम्यान वादळी वाऱ्यासह अर्धा तास गारपीट झाले झाली. यामुळे टोमॅटो, वाटाणा, कोबी, कलिंगड पिकांसह फळबागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Avkali Pavus 2025

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतामध्ये काढून ठेवलेला अथवा चाळीमधील कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली.

चंद्रपूरच्या शेतकऱ्याने दोन एकर मध्ये 24 क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन कसे घेतले?

Avkali Pavus 2025 टाकळी ढोकेश्वर, सुपा परिसरातही विजेच्या कडकडे अवकाळी पावसाने 15 ते 20 मिनिटे हजेरी लावली, पावसामुळे मात्र उन्हाळ्यामध्ये थोड्या कालावधीसाठी गारवा निर्माण झाला.

WhatsApp Group Join Now

गारपिटीचा अवकाळी शेतात सखल भागात बांधामध्ये पाणी साचले होते. एकीकडे दुष्काळी परिस्थितीशी सामना करत पिकविलेला टोमॅटो, वाटाणा, कोबी सह चारा पिकांचे नुकसान झाले.

हवामान विभागाने जिल्ह्याच्या काही भागात 3 ते 6 मे दरम्यान विजांच्या कडकडाटसह वादळी वारा, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला होता.

दरम्यान, सोमवारी (दि. 5) दिवसभर तालुका ढगाळ वातावरण होते. आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याप्रमाणे वातावरण तयार होऊन दुपारी 3 ते 4.30 च्या दरम्यान सुमारास अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

यामुळे यंदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर धांदल उडाली. हवामान विभागाच्या सूचनेमुळे काही शेतकरी सावध होते.

Avkali Pavus 2025 पिके पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

WhatsApp Group Join Now
  • गारपिटीमुळे जवळपास 1 हेक्टरमध्ये लागवड केलेल्या टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
  • लागवड केलेला कोबी पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
  • पिकात पाणी साचले, तसेच गारांचा तडखाही बसला. पिकाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने याचे पंचनामे करावेत, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी तिखोलचे सुभाष ठाणगे, वनकुटीचे बबनराव काळे यांनी केली आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment