जळगाव जिल्ह्यात 37 गावांना टंचाईची झळ, 8 टँकरने पाणीपुरवठा, उरला केवळ 35 टक्के जलसाठा! Jalgaon Dushkal 2025

Jalgaon Dushkal 2025 जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 ते 43 अंशावर कायम आहे. त्यामुळे प्रकल्पासह भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील 37 गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागले आहेत लागल्या आहेत. 28 एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील 7 गावांना 8 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 31 गावात विधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Jalgaon Dushkal 2025

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके जाणवणार नाही, असा अंदाज होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा 42 ते 43 अंशापर्यंत पोहोचला आहे. टंचाईच्या गावात टँकर विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी! जाणून घ्या सविस्तर; 

जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवायला सुरू झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी नियोजन केले गेले आहे.

WhatsApp Group Join Now

टंचाईच्या तीव्रतेचा विचार करून उपाययोजना म्हणून या गावांसाठी टँकर, कुपनलिका, विधन विहिरी अधिग्रहण करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली.

Jalgaon Dushkal 2025 प्रशासनाचे नियोजन, आठ टँकरसह विहिरींचे अधिग्रह

एप्रिल अखेरीस या टँकरसह अधिग्रहित विहिरींच्या संख्येत वाढ झाल्याने मे महिन्यात पाणीटंचाईच्या चटक्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Jalgaon Dushkal 2025 गेल्या आठवड्यात 2 गावांसाठी 3 टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या आठवड्यात टँकरची मागणी वाढली आहे.

त्यानुसार चाळीसगाव तालुक्यात 3 गावांसाठी प्रत्येकी 1, अमळनेर तालुक्यात 2 गावांसाठी 3 ट्रॅक्टर, जामनेर, भडगाव तालुक्यात प्रत्येकी 1 गावासाठी 1 टँकर अशा सात गावांसाठी 8 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे,

WhatsApp Group Join Now

तसेच जामनेर तालुक्यात 6, एरंडोल 1, मुक्ताईनगर, चाळीसगाव व पाचोऱ्यासाठी प्रत्येकी चार, अमळनेर 8, पारोळा 4 अशा 31 गावांसाठी 31 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

याशिवाय जळगाव तालुक्यात नवीन विधन विहिरीसाठी मान्यता देण्यात आली असल्याचेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

Jalgaon Dushkal 2025 धरणांमधील जलसाठ्यात घट

  • मागील 15 दिवसात जिल्ह्यात धरणसाठ्यामध्ये 5 ते 7 टक्क्यांनी घट आली आहे.
  • सध्या जळगाव जिल्ह्यातील मोठ्या गिरणा, वाघूर व हातनूर या तीन धरणांमध्ये 43.96 टक्के जलसाठा आहे.
  • जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा एकूण 17 प्रकल्पांमध्ये अवघा 35.20 टक्के जलसाठा आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment