अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर आंब्याची विक्रमी आवक; कोणत्या आंब्याला किती दर? वाचा सविस्तर; Akshaytritiya Mango Rate 2025

Akshaytritiya Mango Rate 2025 नवी मुंबई : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी 1 लाख 19 हजार पेट्यांमधून तब्बल 1,223 टन आंब्याची आवक झाली आहे. यामध्ये कोकणातील 64 हजार पेट्यांचा समावेश आहे.

Akshaytritiya Mango Rate 2025

अक्षय तृतीयेला आमरसाला विशेष महत्त्व असते. अनेक घरांमध्ये आमरस पुरी, आमरस पोळीचा बेत केला जातो. यामुळे बाजार समितीमध्येही आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात उष्णतेची लाट कायम; IMD ने जारी केला अलर्ट वाचा सविस्तर; 

Akshaytritiya Mango Rate 2025 कोकणासह दक्षिणेकडील राज्यांमधूनही आंब्याची आवक वाढली आहे. कोकणातून 64 हजार तर दक्षिणेकडील राज्यांमधून 55 हजार आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे.

WhatsApp Group Join Now

कोकणातील हापूसचा हंगाम आता कमी होत जाणार असून, दक्षिणेकडे राज्यांमधील आवक वाढण्यास सुरुवात होणार आहे. मे च्या सुरुवातीला गुजरात मधील अंबा विक्रीसाठी दाखल होणार आहे.

देवगड हापूस चा हंगाम 4 दिवसात संपण्याची शक्यता आहे. रत्नागिरीची आवक 25 मे पर्यंत आणि रायगडचा हापूस 5 जून पर्यंत उपलब्ध होणार आहे.

जुन्नर हापूस मे अखेरपासून उपलब्ध होणार आहे. जून अखेरीस उत्तर प्रदेशच्या आंब्याचा हंगाम सुरू होणार आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

Akshaytritiya Mango Rate 2025 आंब्याचे दर

आंबाघाऊककिरकोळ
हापूस डझन300 ते 800500 ते 1,300
बदामी किलो40 ते 6580 ते 125
लालबाग40 ते 5080 ते 100
तोतापुरी30 ते 4060 ते 70
केसर60 ते 100100 ते 120

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment