कम्बाईन हार्वेस्टर योजनेअंतर्गत मिळणार 11 लाखांचे अनुदान! Combine Harvester Subsidy 2025

Combine Harvester Subsidy 2025 सध्या आपण मॉर्डन कृषी यंत्रणे बघत आहोत, त्यातलेच एक कम्बाईन हार्वेस्टर. हे एक कृषी यंत्र आहे जे शेतात धान्य काढणे, धान्य निवडणे, धान्याची छाटणी करून त्याला वेगळे करणे एकाच वेळी करत असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचते.

Combine Harvester Subsidy 2025

कम्बाईन हार्वेस्टर हे पीक कापायचे काम करते. पीक कापल्यानंतर तुटलेल्या भागांपासून धान्य वेगळे करत असते. तसेच पिकासोबत आलेल्या कचऱ्याला वेगळे करत असते. कम्बाईन हार्वेस्टर पीक काढण्याचे काम वेगाने करते. पारंपारिक रीतीने पीक काढण्यासाठी अधिक वेळ लागत असतो. त्यासाठी शेतकऱ्याला अधिक खर्च आणि अधिक वेळही लागत असतो.

कांदा चाळीत साठवताना थर कसे लावावेत? जेणेकरून कांदा जास्त काळ टिकेल;

मात्र, कम्बाईन हार्वेस्टरच्या मदतीने वेळ आणि खर्च कमी लागतो. कम्बाईन हार्वेस्टर एकाच वेळी पीक कापते, मांडणी करते आणि धान्य वेगळे करते. यामुळे वेगवेगळे कामही एकाच वेळी होतात, ज्यामुळे कामाची गती वाढते.

WhatsApp Group Join Now

या यंत्रामुळे पीक काढण्याच्या कामासाठी कमी मजुरांची आवश्यकता असते, ज्यामुळे खर्च देखील कमी होतो. या यंत्रामुळे कापणीची प्रक्रिया अतिशय पद्धतशीर आणि स्वच्छ होते. ज्यामुळे धान्याची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते.

Combine Harvester Subsidy 2025 फायदे

कम्बाईन हार्वेस्टरचा (Combine Harvester Subsidy) वापर केल्यामुळे पिकांचे नुकसान कमी प्रमाणात होते आणि उत्पादन अधिक मिळवता येते.

हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे. कम्बाईन हार्वेस्टरचा वापर जास्त करून गहू, भात, मका, सोयाबीन आणि अन्य पिकांमध्ये केला जातो.

हे यंत्र पीक काढण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वेळ वाचवते आणि कामाची गती वाढवते.

WhatsApp Group Join Now

Combine Harvester Subsidy 2025 यंत्र खरेदी

  • कम्बाईन हार्वेस्टरची किंमत विविध गोष्टींवर अवलंबून असते. जसे की ब्रँड, क्षमता, मॉडेल, आणि तंत्रज्ञान. साधारणपणे, कम्बाईन हार्वेस्टरची किंमत ₹15 लाख ते ₹35 लाख किंवा त्याहून अधिक असू शकते.
  • एखाद्या विशेष ब्रँडची किंवा विशिष्ट प्रकारची कम्बाईन हार्वेस्टर घेत असल्यास त्याची किंमत स्थानिक डीलर्स किंवा विक्रेत्यांकडून अधिक स्पष्ट माहिती मिळवून तपासू शकता.

11 लाखांचे अनुदान

भारत सरकार शेतकऱ्यांना कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी सबसिडी प्रदान करते. हार्वेस्टर सबसिडी योजनेच्या माध्यमातून कम्बाईन हार्वेस्टरसाठी सरकारकडून जास्तीत जास्त 50 टक्के अनुदान 11 लाख रुपयांच्या मर्यादेमध्ये दिले जाते. या हार्वेस्टरसाठी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर तुम्हाला अर्ज करता येईल.

Combine Harvester Subsidy 2025 आवश्यक कागदपत्रे

  1. आधारकार्ड
  2. बँक पासबुक
  3. जमिनीचा ७/१२ व ८अ उतारा
  4. जातीचा दाखला (जात प्रवर्गातून अर्ज करीत असल्यास)
  5. पॅनकार्ड
  6. स्वयंघोषणापत्र
  7. शेतकरी करारनामा
  8. कोटेशन
  9. टेस्ट रिपोर्ट
  10. जीएसटी बिल इत्यादी सादर करावी लागतात.

शेतकऱ्यांनी कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी सबसिडीचे अर्ज भरल्यानंतर, हा अर्ज मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे पाठवला जातो.

संपर्कया योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment