अवकाळी पावसानंतर पिकांचे असे करा व्यवस्थापन; Pik Vyasthapan 2025

Pik Vyasthapan 2025 जळगाव (प्रतिनिधी) : वातावरणातील बदलांमुळे वेळी-अवेळी, अवकाळी पाऊस होत आहे. या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषत: भाजीपाला, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Pik Vyasthapan 2025

रब्बी हंगामाच्या बाबतीत बोलायचे तर, रब्बीच्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. गहू, हरभरा यासारख्या पिकांची काही ठिकाणी पेरणी झाली आहे तर काही ठिकाणी अद्याप पेरणी बाकी आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

खरीप पेरणीचे ‘इतके’ हेक्टरवर क्षेत्र प्रस्तावित! वाचा ‘या’ जिल्ह्याचे खरीप नियोजन सविस्तर;

Pik Vyasthapan 2025 मात्र, अशा परिस्थितीतही योग्य व्यवस्थापन केल्यास अवकाळी पावसामुळे होणारे पिकांचे नुकसान आपण काही प्रमाणात का होईना कमी करु शकतो. ममुराबाद कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती यांनी अवकाळी पावसानंतर पिकांचे कसे व्यवस्थापन करावे, यासंदर्भात माहिती दिली असून आपण ती जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now

कापूसहे अत्यंत महत्वाचे पीक आहे. या पिकाची वेचणी लवकर होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकात पाणी जमा साचून नुकसान होण्याची शक्यता आहे. कापूस या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी ज्या भागात पाणी साचले आहे अशा भागात चर मारून पाण्याचा निचरा करुन घ्यावा. शेतात पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच तयार कापसाची वेचणी लवकरात लवकर करुन त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
केळीकेळी या पिकाचेही अवकाळीमुळे मोठे नुकसान होते. पाने फाटणे, घड खाली सरकने किंवा पाणी जास्त झाल्यामुळे झाड आडवे पडून नुकसान होते. अशा अवस्थेत नुकसान टाळण्यासाठी झाडांना बांबूच्या सहाय्याने आधार दिल्यास नुकसान टळू शकते.
रब्बी ज्वारीअवकाळी पावसामुळे रब्बी ज्वारीचे पीक पिवळे पडू शकते. हा पिवळसरपणा घालविण्यासाठी 2% युरीयाची फवारणी केल्यास होणारे नुकसान टाळू शकतो.
हरभराअवकाळी पाऊस हा गहू, हरभरा अशा पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कोरडवाहू किंवा बागायती हरभरा असेल तर त्या ठिकाणी मर रोग किंवा झाड उबसणीचा प्रादुर्भाव होवू शकतो. अशा ठिकाणी कार्बेन्डाझीम बुरशीनाशक किंवा प्रोपीकोनॅझोल यासारख्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करुन घेतली तर कमीत कमी नुकसान होण्यास मदत होईल.
ज्वारी/मका ढगाळ वातावरण व कमी तापमानामुळे लष्करी अळींना पोषक वातावरण तयार झाले आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी आणि मका या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. अशावेळी शेतात कामगंध सापळे लावावेत. पानांवर खड्डे तसेच अळ्यांनी पाने खाल्ले असतील तर अशा ठिकाणी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी किंवा 3 मि.लि. ग्राम क्लोरॅनिलिप्रॉल या रासायनिक औषधाची फवारणी पोघ्यामध्ये करावी.
लिंबुवर्गीय पिकेलिंबुवर्गीय पिकांमध्ये खैर्‍या अर्थात खरड्या वाढू शकतो. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी 25 ग्रॅम ऑक्झीक्लोराईड 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने मोकळीक दिल्यानंतर फवारणी करावी.
डाळींब अवकाळीमुळे फुल आणि फळगळ होवू शकते. ही फुल आणि फळगळ रोखण्यासाठी सर्वात आधी गळ झालेल्या फुल, फळ, फांद्या यांचे अवशेष गोळा करुन त्यांना शेताबाहेर फेकून नष्ट केले पाहिजेत. हे अवशेष तसेच राहू दिले तर झाडावर रोगाचा प्रादुर्भाव होवू शकतो. बागेत स्वच्छता ठेवून नियमित बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे. आवश्यकता वाटल्यास पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करु शकतो.

Pik Vyasthapan 2025 अशी वाढवा बुरशीनाशकाची कार्यक्षमता

Pik Vyasthapan 2025 पावसामध्ये फवारणी करतांना काही काळजी घेणे गरजेचे आहे. अशा वातावरणात किटकनाशक किंवा बुरशीनाशकाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्टिकर किंवा स्प्रेडरचा वापर केला पाहिजे.

द्राक्ष पिकावर आळीपाळीने आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा वापर उपयोग करावा. हे करीत असतांना स्टिकरचे मिश्रण करणे गरजेचे आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment