PM Kisan Yojana 2025 पीएम किसान योजना देशभरातील जमिनी धारक शेतकऱ्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली.

WhatsApp Group
Join Now
PM Kisan Yojana 2025 या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात समान हप्त्यामध्ये प्रति वर्ष 6,000/- रुपये हस्तारीत केले जातात.
मुंबई ते परांडा बाजारात लोकल जातीच्या गव्हाला मागणी; जाणून घ्या आजचे बाजार भाव!
PM Kisan Yojana 2025 काही लाभार्थ्यांना बरेच दिवस झाले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) चे हप्ते मिळणे बंद झाले आहेत. हे हप्ते बंद होण्याची कारणे काय, त्यावर उपाय काय ते पाहूया…

| अ. क्र | कारणे | उपाय काय करावे? |
| 1 | जमिनीचे प्रमाणिकरण नसणे. (Land Seeding) | महसुली विभागाचे संपर्क करून जमिनीचे (Land Seeding) करून येणे. |
| 2 | ईकेवायसी केलेली नसणे. (e-KYC) | स्वतः सीएससी किंवा गावातील कृषी सहाय्यक यांच्यामार्फत ईकेवायसी करून घेणे. |
| 3 | बँक खाते आधार लिंक नसणे. | बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा नजीकच्या पोस्टात DBT Enable खाते उघडणे |
| 4 | PM Kisan Yojana 2025 बँक खाते DBT Enable नसणे. | आधार खाते लिंक करून घेणे किंवा नजीकच्या पोस्टात DBT Enable खाते उघडणे. |
| 5 | आधार लिंक बँके खाते बंद असते. | बँक खाते सुरू करून घेणे. |
| 6 | बँक खात्यास दुसऱ्या कुणाचे आधार लिंक असणे. | बँकेत जाऊन दुरुस्ती करून घेणे. |
| 7 | नोंदणीनंतर आधार मध्ये दुरुस्ती करणे. | स्वतः किंवा सीएससीमार्फत पोर्टलवर आधार दुरुस्ती करून घेणे. |
| 8 | नोंदणी केल्यानंतरच्या काळात आयकर भरणा करणे. | अर्ज अपात्र होतो. |
| 9 | स्वतः योजना चा लाभ समर्पित करणे. | योजनेत परत लाभ घेता येणार नाही. |
| 10 | विविध कारणास्तव अर्ज अपात्र असणे. | आपण पात्र असूनही अपात्र घोषित केले असेल तर सर्व अधिकृत पुराव्यासह (कागदपत्रे) तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अपात्रता मागे घेण्याबाबत अर्ज करणे. |
| 11 | लाभार्थी मयत झाल्यामुळे अपात्र होणे. | अर्ज अपात्र होतो. |
| 12 | नोंदणी नंतर जमिनीची विक्री केल्याने भूमिहीन होणे. | योजनेत परत लाभ घेता येणार नाही |
| 13 | बँकेकडून व्यवहार (Transaction Failure) नाकारणे. | बँकेत जाऊन चौकशी करून त्रुटी दूर करणे. |
WhatsApp Group
Join Now
| संपर्क | अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तथा तालुका नोडल अधिकारी पीएम किसान यांच्याशी संपर्क करावा. |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |