दोन एकर मिरचीतून मिळाले साडे तीन लाख रुपयांचे उत्पन्न, युवा शेतकऱ्याची कमाल! Farmer Success Story 2025

Farmer Success Story 2025 भंडारा : सर्वांना रोजगाराची शाशवती देणारा शेती हाच एकमेव उद्योग जगासाठी समर्पित ठरला आहे. शेतीकडे नकोशी म्हणून बघणाऱ्यांना पालांदूरच्या अरुण पडोळे या युवकाने शेतीत नवा आदर्श तयार केला आहे. गत दहा वर्षापासून मिरची उत्पादनात त्यांचा हातखंडा आहे. दोन एकर मिरचीच्या बागेत 3.50 लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत पोहोचण्याची मनीषा अंतिम टप्प्यात आली आहे.

Farmer Success Story 2025

इतर पिकांपेक्षा वातावरणातील परिवर्तनामुळे मिरची पीक उत्पादित करणे कठीण होत आहे. बारीक पाखरे, फुल-किडे व चुरडा-मुरड्याच्या प्रकाराने कित्येक मिरची बागायतदार संकटात सापडले. त्यांनी अनुभवाचा आधार घेत आलेल्या किडीवर नियंत्रण मिळवित दोन लाख रुपयांच्यावर हिरवी मिरची विकण्यात आली.

रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? आणि त्याच्या पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर;

Farmer Success Story 2025 आता लाल मिरचीचा तोडा!

हिरव्या मिरचीचे भाव घसरल्याने अभ्यासू पडोळे यांनी लाल मिरची करण्याचा निर्णय घेतला. गत तीन दिवसांपासून लाल मिरचीचा तोडा सुरू केला आहे. अख्खा मिरचीचे बाग लालच लाल झाले आहे. 15 क्विंटल मिरची मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ झाली आहे.

WhatsApp Group Join Now

Farmer Success Story 2025 अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही

उत्पन्नाच्या अर्धे खर्चात, तर अर्धा नफा मिरचीच्या बागेतून अरुण पडोळेला मिळणार. यात 50 मजुरांना 9 महिने काम मिळाले, हे विशेष! कमी पाण्यात व्यवस्थित नियोजन मिरची बागेचे केल्यास एकराला लाख रुपयाचा नफा शक्य आहे. -अरुण पडोळे, मिरची उत्पादक, पालांदूर.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment