सव्वापाच लाख दूध उत्पादकांच्या खात्यावर 1327 कोटींचे अनुदान जमा, वाचा सविस्तर; Dudh Anudan 2025

Dudh Anudan 2025 राज्य सरकारने राज्यातील सव्वा पाच लाख गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 1327 कोटी 28 लाख रुपयांचे दूध अनुदान वर्ग केले आहे. उर्वरित 261 कोटींचे अनुदान महिन्याअखेर जमा केले जाणार आहे. राज्याची तुलनेत 1588 कोटींपैकी 960 कोटींचे अनुदान दक्षिण महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना मिळाले आहे.

Dudh Anudan 2025

गाईच्या दुधाचे उत्पादन वाढल्याने डिसेंबर 2023 पासून राज्यातील दूध संघाने खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. बाटली बंद पाण्याच्या दरापेक्षाही कमी दरानेआणि दूध खरेदी केली.

ट्रम्प टॅरिफचा बळीराजाला फटका? शेती क्षेत्रावर काय परिणाम होणार?

यासाठी, राज्य शासनाने 11 जानेवारी ते 10 मार्च व जुलै ते सप्टेंबर या महिन्यांसाठी प्रतिलिटर पाच रुपये, तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यासाठी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

जिल्हाअनुदान
पुणे 460.80
अहमदनगर458.79
सोलापूर203.78
कोल्हापूर103.99
सातारा100.59
सांगली91.07
नाशिक56.39

Dudh Anudan 2025 तिन्ही टप्प्यांतील सुमारे सव्वापाच लाख दूध उत्पादक

WhatsApp Group Join Now

आतापर्यंत तिन्ही टप्प्यातील 1327 कोटी 28 लाख रुपये सुमारे सव्वा पाच लाख दूर उत्पादकांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत.

किमान हमीभाव 34 रुपये कागदावरच

राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना प्रति लिटर 34 रुपये किमान भाव देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. पण गेल्या वर्षभरात त्यांचे पालन कोणत्याच दूध संघाने केले नाही.

Dudh Anudan 2025 त्रुटींची पूर्तता केलेल्यांना मिळणार अनुदान

WhatsApp Group Join Now
  • दूध उत्पादक शेतकऱ्यांनी माहिती भरताना बँकेचा खाते क्रमांक किंवा ‘आयएफसी’ कोड चुकल्याने अनेकांचे अनुदान आलेले नाही.
  • संबंधित शेतकरी पात्र आहेत, पण त्रुटीमुळे खात्यावर पैसे वर्ग झालेले नाहीत. त्रुटींची पूर्तता केलेल्या यांच्या खात्यावर पैसे वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.

शासनाने दूध अनुदान वाटपाचे प्रक्रिया राबवत असताना एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली. कोल्हापूर, सांगलीतील दूध उत्पादकांचे दोन टप्प्यातील शंभर टक्के अनुदान जमा झाले आहे. उर्वरित दोन महिन्यांचे पैसे आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत. – एन. पी. दवडते, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सांगली”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment