Pik Vima 2025 सोलापूर उभे पीक असताना व पीक काढणी केल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाले तर शेतकऱ्यांना यापुढे पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार नाही तर पीक कापणी प्रयोगावर अवलंबून विमा कंपनी नुकसान भरपाई देणार आहे. अलीकडे राज्यात सततधार अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे पीक नुकसानीत वाढ झाल्याने विमा कंपनीच्या निकषात बदल केले होते.

मात्र पुन्हा शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसाठी जुनेच निकष लावले जाणार आहेत. राज्य शासनाच्या बैठकीच्या इतिवृत्तात ही बाब समोर आली आहे. अलीकडच्या काही वर्षात निसर्ग लहरीत फार बदल झाला आहे. कडक उन्हाळ्यात मध्येच आभाळ येते व पाऊसही पडतो. पावसाळ्यात ढगफुटीसारखा धो-धो, अतिवृष्टी व संततधार पाऊस पडतो. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान होते. हे प्रमाण वाढले आहे.
दुहेरी पीक पद्धतीचा यशस्वी प्रयोग; संत्रा बागेत फुलली मिरची! वाचा सविस्तर;
Pik Vima 2025 पावसाळ्यात व कधीही पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिके पाण्यात जातात व धान्य खराब होते. पीक काढून ठेवले पावसाने गाठले तरीही धान खराब होते. सध्या अतिवृष्टी व संततधार पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे नुकसान भरपाई विमा कंपनीकडून दिले जाते.

मात्र, शासनाने या दोन्हीमुळे पिकांचे नुकसान झाले, तर पिक विमा पोटी नुकसान भरपाई द्यायची नाही, असा निर्णय घेतला आहे. केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक नुकसान भरपाई विमा कंपनीला द्यावी लागणार आहे.
Pik Vima 2025 केंद्र सरकारचे पीक कापणी प्रयोग नुकसान भरपाई देण्याचे निकष आहेत, मात्र राज्य शासनाने प्रतिकूल घटकामुळे पेरणी न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, काढणी पश्चाच नुकसान व स्थानिक नैसर्गिक आपत्ती, या चार बाबींचा समावेश केला जातो.
2016-17 ते 2923-24 या आठ वर्षातून विमा कंपन्यांना 43 हजार 201 कोटी रुपये हफ्ता राज्य शासनाकडून दिला असून, शेतकऱ्यांना 32 हजार 658 कोटी नुकसान भरपाई दिली आहे. विमा कंपन्यांना 10 हजार 543 कोटी नफा झाला आहे.
Pik Vima 2025 एक रुपयाचा पिक विमा बंद!
- शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांशी ठरलेल्या एक रुपयात पिक विमा योजना गुंडाळून केंद्राच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या विम्याची रक्कम भरावी लागणार आहे.
- एक रुपयात पिक विमा भरायचा असल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लाखांच्या पटीत वाढली आहे.
- मात्र, आता रक्कम भरावी लागणार असल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आपोआप घटणार आहे.
- एक रुपयात पिक विमा योजनेमुळे बोगसगिरी वाढली होती ती नव्या निकषामुळे कमी होईल.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |