खरीप पेरणीचे ‘इतके’ हेक्टरवर क्षेत्र प्रस्तावित! वाचा ‘या’ जिल्ह्याचे खरीप नियोजन सविस्तर; Kharip Niyojan 2025

Kharip Niyojan 2025 यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत बुलढाणा जिल्ह्याकडून करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 7 लाख 51 हजार 357 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

Kharip Niyojan 2025

खरीप हंगामासाठी 1 लाख 24 हजार 813 क्विंटल बियाणे लागणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली. यंदाचा पावसाळा सुरू होण्यास दीड महिन्याचा कालावधी उरला आहे.

‘या’ जिल्ह्यातील पिक विम्याचे पैसे आले, पुढील आठवड्यात जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर;

या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील पेरणीचे नियोजन, त्यासाठी लागणारे बियाणे आणि खत साठ्याच्या मागणीचे नियोजन जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले असून, या नियोजनाचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालकाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात 7 लाख 51 हजार 357 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी प्रस्तावित आहे. दरम्यान, खते आणि बियाण्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now

Kharip Niyojan 2025 पेरणीसाठी असे आहे बियाण्याचे नियोजन!

Kharip Niyojan 2025 जिल्ह्यातील खरीप पेरणीसाठी एकूण 1 लाख 24 हजार 813 क्विंटल बियाणे लागणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीनचे महाबीजमार्फत 18 हजार 592, एन.एस.सी 5 हजार आणि इतर कंपन्यांमार्फत 87 हजार 905 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Kharip Niyojan 2025…..1,85,487 मॅट्रिक टन खत साठा मंजूर!

  • जिल्ह्यासाठी येत्या खरीप हंगामात 1 लाख 85 हजार 487 रासायनिक खतांचा साठा कृषी आयुक्त आयुक्तालयामार्फत मंजूर करण्यात आला आहे.
  • युरिया, डीएपी, संयुक्त खते आदी खतांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी अनगाईत यांनी दिली.

2024 मध्ये 7 लाख 37 हजार क्षेत्रावर झाली होती पेरणी!

WhatsApp Group Join Now

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीच्या प्रस्तावित नियोजनात एकूण 7 लाख 51 हजार 357 हेक्टर खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात सर्वाधिक सोयाबीन व कपाशीचा पेरा प्रस्तावित करण्यात आला. 2024 मध्ये जिल्ह्यात 7 लाख 37 हजार 414 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

जिल्ह्यात येत्या खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली असून, नियोजन सुरू केले आहे. नियोजनानुसार पेरणीसाठी सोयाबीन कपाशी आधी पिकांच्या वाणांचे एक लाख 24 हजार 813 क्विंटल बियाणे लागणार आहे.– पी. ई. अनगाईत, कृषी विकास अधिकारी, बुलढाणा”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment