काजू बी मधून काजू काढण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया करतात? वाचा सविस्तर; Kaju Prakriya 2025

Kaju Prakriya 2025 काजू लागवडीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. ओला काजू गर, वाळलेली काजू बी विक्री करणारे बागायतदार भरपूर आहेत. परंतु, काजू बी प्रक्रियेवर आधारित व्यवसाय काहींनी सुरू केले आहेत. काजू बी मधून काजूगर हाताने किंवा यंत्राच्या पद्धतीने चांगल्या प्रकारे काढणे, या प्रक्रियेला काजू प्रक्रिया उद्योगात विशेष महत्त्व आहे.

Kaju Prakriya 2025

काजू बी भाजणे ही सुद्धा महत्वपूर्ण बाब आहे. काजू बिया तीन पद्धतीने भाजता येतात. पहिल्या पद्धतीत काजू बी उघड्या सच्छिद्र भांड्यात भाजल्या जातात. या पद्धतीत काजू टरफलातील तेल जळून जाते व काजूगर टोकाकडे काळपट होण्याची भीती असते.

महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची लाभार्थी यादी पहा ऑनलाइन; 

Kaju Prakriya 2025 ड्रममध्ये बिया भाजणे

या पद्धतीत काजू बिया लोखंडी ड्रम मध्ये (3.5*1.0) भाजण्यात येतात. ड्रम सच्छिद्र असून, तिरका बसवलेला असतो. बिया अतिशय गरम तांबड्या लाल इममध्ये भरतात. इम गोलाकार फिरत असतो. काजू टरफल तेल जोरात बाहेर येऊन जळत राहते आणि त्यामध्ये काजू बिया भाजल्या जातात.

WhatsApp Group Join Now

याकरिता ड्रम 3 ते 4 मिनिटे सतत फिरत ठेवावा लागतो. यानंतर ड्रमच्या खालच्या टोकाकडून भाजलेल्या बिया काढल्या जातात. त्यावर लगेच राख पसरतात, जेणेकरून टरफलावरील गर काढण्याचा वेग, पूर्ण गर मिळण्याचे प्रमाण जास्त, तसेच गराचा दर्जा सुद्धा चांगला असतो.

या पद्धतीचा दोष म्हणजे, काजू टरफल तेलाचे पूर्णपणे होणारे नुकसान तसेच मजुरांना सतत उष्ण वातावरणात काजू तेलाच्या वाफेत राहावे लागते.

Kaju Prakriya 2025 टरफल तेलात बिया भाजणे…

या पद्धतीत मोठ्या टाकीत काजू टेम्पल टरफल तेल ओतून त्याचे तापमान 200 अंश सेल्सिअस पर्यंत आणले जाते. त्यामध्ये काजू बिया लोखंडी जाळीच्या सहाय्याने दीड मिनिटे बुडतात. टाकी माईल्ड स्टीलच्या पातळ पत्र्यापासून तयार करतात.

WhatsApp Group Join Now

टाकी चौकोनी असून, तिची रुंदी 2 मीटर व खोल एक मीटर असून, विटाच्या भट्टीत व्यवस्थित बसवतात. या पद्धतीमध्ये काजू बी टरफलातील 80 ते 90 टक्के तेल मिळवता येते.

बिया समप्रमाणात भाजतात आणि पूर्ण सफेद गरांचे प्रमाण जास्त मिळते. इतर भाजण्याच्या पद्धती प्रमाणे काजूगर काळपट पडत नाही.

Kaju Prakriya 2025 काजू बी वाफवणे!

  • काजूगर काढण्यासाठी भाजण्याबरोबर वाफवण्याचीही पद्धत आहे. वाफवल्यामुळे अन्य पद्धतीपेक्षा गरावर डाग येत नाही.
  • काजू बिया काढणीनंतर ड्रॉईगयार्ड वर दोन दिवस चांगल्या सुकवाव्यात, त्यानंतर बॉयलरमध्ये बिया घालव्यात.
  • साधारणतः 320 किलो बियांच्या बॉयलर मध्ये बिया व्यवस्थित वाफवण्यासाठी पहिल्या लॉटला दोन तास लागतात.
  • या पद्धतीमुळे काजूगराचा तुकडा पडण्याचे प्रमाण 15 टक्के असते. बहुतांश उद्योजक या प्रक्रियेचा अवलंब करतात.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment