काय आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जाणून घ्या सविस्तर; CMEGP Yojana 2025

CMEGP Yojana 2025 राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ सुरू केला आहे. या कार्यक्रमात ग्रामीण आणि शहरी भागातील लघु उद्योगांची स्थापना केली जाते.

CMEGP Yojana 2025

या कार्यक्रमांतर्गत तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. हा क्रेडिट लिंक्ड सबसिडी कार्यक्रम आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जातो.

शेतकऱ्यांना मिळते 3000 रुपये पेन्शन; फक्त ‘हे’ काम करा; 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम काय आहे

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा महाराष्ट्र राज्य सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो बेरोजगार युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान आणि कर्ज दिले जाते.

WhatsApp Group Join Now

या योजनेचा मुख्य उद्देश असा की, युवकांना छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम बनवणे. हा कार्यक्रम 2025 मध्ये अधिक गतीने राबविला जाणार आहे आणि त्या सहभागी होण्यासाठी युवकांना काही महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.

CMEGP Yojana 2025 योजना कशा प्रकारे काम करते?

‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’, प्रत्येक उद्योजकाला 10 लाख रुपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज आणि अनुदान दिले जाणार दिले जाते.

हे कर्ज आणि अनुदान युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले संसाधने, उपकरणे, कच्चा माल, आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी मिळते.

यात खुल्या प्रवर्गातील युवकांसाठी 25% पर्यंत अनुदान, तर राखीव प्रवर्गातील युवकांसाठी 25% ते 35% पर्यंत अनुदान दिले जाते.

WhatsApp Group Join Now

CMEGP Yojana 2025 योजनेचे निकष काय?

  • उमेदवाराचे वय किमान 18 वर्षांवर असावे.
  • उत्पन्नाची मर्यादा नाही.
  • उमेदवार कमीत कमी आठवी पास असावा.
  • महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यांनी कोणताही उद्योग सुरू केलेला नसावा.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात 3,748 तरुण-तरुणींनी उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज दाखल केले आहेत.

यापैकी 2,903 अर्ज जिल्हा उद्योग केंद्राकडून विविध बँकांकडे पाठविले आहेत. यामधून आतापर्यंत 911 जणांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यामध्ये 512 महिलांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, प्रस्ताव मंजूर केलेल्या महिलांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 173, ओबीसीमधील 175 एससी आणि एसटीमधील 147 आणि अल्पसंख्यांकमधून एक याप्रमाणे महिलांचे, तसेच 400 युवकांचे प्रस्ताव बँकांनी मंजूर केले आहेत. यापैकी लाभार्थींना शासनाकडून अनुदान देण्यात आले आहे.

CMEGP Yojana 2025 या माध्यमातून महिलांनी विविध क्षेत्रात उद्योग स्थापन करीत स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. स्थानिक बँकांमार्फत कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, जिल्हा उद्योग केंद्राकडून त्यासाठी सहकार्य केले जात आहे.

जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या उद्योग व्यवसायाकरिता युवक-युवतींचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे प्राप्त झाले होते.

त्यानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेले प्रस्ताव विविध बँकांकडे पाठविले जातात. संबंधित बँकेकडून उद्योग-व्यवसायाकरिता कर्ज पुरवठा केला जातो. 911 प्रस्तावांना मंजुरी मिळाली. यात महिलांची संख्या अधिक आहे.

3748 जणांचे अर्ज

जिल्हा उद्योग केंद्राकडे प्राप्त झालेल्या सुमारे 3 हजार 748 युवक-युवतींचे विविध उद्योग व्यवसायकरिता जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज प्राप्त झाले आहेत.

512 महिला उद्योगात

जिल्हा उद्योग केंद्राकडे प्राप्त झालेल्या 3748 अर्जापैकी 2903 प्रस्ताव बँकांकडे पाठवले होते. यापैकी 2903 जणांचे प्रस्ताव बँकांनी नाकारले आहेत. 911 प्रस्ताव मंजूर केले आहेत. यात 512 महिलांनी उद्योग सुरू केले आहेत.

CMEGP Yojana 2025 आकडेवारी

एकूण प्रस्ताव3748
बँकेकडे पाठवले प्रस्ताव2903
बँकांनी मंजूर केलेले प्रस्ताव911
अनुदान दिलेले लाभार्थी205

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील अनेक युवक-युवती उद्योग उद्योजक बनले आहेत. यात महिलांचा सहभाग उत्साहवर्धक आहे.

जिल्ह्यात 911 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यामध्ये 512 महिलांना उद्योगासाठी अर्थसाह्य दिलेले आहे. -अमोल निकम, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment