राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली, जाणून घेऊया सविस्तर; Farmer id 2025

Farmer id 2025 पुणे राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसेच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्री स्टॅक योजना राबविण्यात येत असून, या योजनेत आतापर्यंत 91 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.

Farmer id 2025

पंतप्रधान किसान सन्मान योजना चा लाभ देताना ओळख क्रमांक बंधनकारक केले आहे. लाभार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत राज्यातील 75 टक्के लाभार्थ्यांना क्रमांक देण्यात आला आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

आता विहिरी, शेतरस्ते, घरकुल लाभार्थ्यांना शून्य रॉयल्टी, शासन निर्णय आला!

Farmer id 2025 पुढील टप्प्यात थेट शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करता येणार….

WhatsApp Group Join Now
  1. शेतकऱ्यांकडे असलेली जमीन आधार क्रमांकाशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यात ॲग्री स्टॅक ही योजना राबविण्यात येत आहे.
  2. यासाठी राज्यभरातील तलाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना ओळख क्रमांक देत आहेत.
  3. या जोडीला आता सामायिक सुविधा केंद्रामधूनही शेतकरी ओळख क्रमांक करून घेत आहेत.
  4. भूमी अभिलेख विभागाने या पुढील टप्प्यात आता थेट शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.
  5. त्यानुसार ॲग्री स्टॅकच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे.
  6. राज्यात या योजनेत आतापर्यंत 21 लाख 70 हजार 418 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
  7. त्यापैकी 21 लाख 68 हजार 632 शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.
  8. पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना हा ओळख क्रमांक बंधनकारक केला आहे.
  9. त्यानुसार या लाभार्थ्यांची तुलना केल्यास राज्यात 75 टक्के शेतकऱ्यांना क्रमांक मिळाला आहे.

Farmer id 2025 अहिल्यानगर ठरले अग्रेसर!

  • अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक 6 लाख 1हजार 161 शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिले आहेत.
  • या जिल्ह्यात पीएम किस आणि योजनेचे 7 लाख 11 हजार 552 लाभार्थी असून ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment