शेतीसाठी पाणी, मत्स्यपालनही, मालेगावमध्ये दोन वर्षात 222 शेततळ्यांची निर्मिती; Shet Tale Nirmiti 2025

Shet Tale Nirmiti 2025 नाशिक कोरडवाहू शेतीला सिंचनाचा आधार देण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी परियोजना (पोकरा) या दोन योजनांमुळे मालेगाव तालुक्यात जलसाठ्याच्या पायाभूत सुविधांना चालना मिळाली आहे.

Shet Tale Nirmiti 2025

सर 2022-2024 या कालावधीत तालुक्यात एकूण 222 शेततळ्यांची निर्मिती झाली असून, यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.

आता विहिरी, शेतरस्ते, घरकुल लाभार्थ्यांना शून्य रॉयल्टी, शासन निर्णय आला! 

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी प्रत्येकी 75 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते, तसेच पोकरा योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदानाची तरतूद आहे. या अंतर्गत तालुक्यातील 205 लाभार्थ्यांना एकूण 1 कोटी 29 लाख 45 हजारांचे म्हणजे प्रत्येकी 1 लाख 17 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now

Shet Tale Nirmiti 2025 शाश्वत सिंचनाची गरज!

शेततळ्यामुळे पावसाच्या अविश्वासार्हतेवर माता करता येते. मालेगाव तालुक्यातील 15000 हेक्टर वरील फळबागांचे संरक्षण, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, बागायती पिकांची देखभाल आणि मत्स्यपालनातून अतिरिक्त किमान 2 लाख रुपये उत्पन्न मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत.

विशेषतः फळबाग, भाजीपाला आणि हंगामी पिकांसाठी शेततळे ही एक चांगली व व्यवहार्य संकल्पना आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असून, पाणी टिकवून ठेवल्यामुळे दुष्काळी स्थितीतही पिक वाचवता येते.

Shet Tale Nirmiti 2025 कामाची प्रक्रिया

  • चार आकाराच्या शेततळ्यांच्या प्रकाराचा समावेश.
  • डीबीटी पोर्टल द्वारे शेतकरी नोंदणी करतात.
  • लॉटरी द्वारे पात्र शेतकऱ्यांची निवड होते.
  • विभागाच्या सहाय्याने पाणी व 4 मार्गदर्शन.
  • शेततळे खोदकाम व प्लास्टिक आस्तरीकरण.
  • पाण्याचा शाश्वत साठा निर्माण झाल्यामुळे जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि मत्स्यपालनासाठी संधी उपलब्ध झाली आहे.

WhatsApp Group Join Now

Shet Tale Nirmiti 2025 ही संधी शेतीला स्थैर्य देणारी…

शेतकरी काळू बोरसे म्हणाले की, माझ्यासारखे कमी क्षेत्र असलेल्या पारंपरिक शेतकरी आज गावात यशस्वी डाळिंब बागायतदार म्हणून ओळखला जातो. हे फक्त शेततळ्यामुळे शक्य झाले.

याचा मला अभिमान आहे. तर तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे म्हणाले की, शेतकऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, ही संधी शेतीला स्थैर्य, उत्पादन क्षमता देणारी आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment