कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता ‘फार्मर आयडी’ बंधनकारक शासन निर्णय आला! Farmer id Update 2025

Farmer id Update 2025 राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिमणकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने अनुसरून राज्यात ऍग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.

Farmer id Update 2025

या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भितकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रित रित्या तयार करण्यात येत आहेत.

दहा दिवसांतच नाशिकचा पाणीसाठा सात टक्क्यांनी घटला, वाचा सविस्तर;

त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतांसह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now

Farmer id Update 2025 शासन निर्णयात काय म्हटले आहे?

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक दिनांक.15.04.2025 पासून अनिवार्य करण्यात आले आहे.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इ. मध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी.

Farmer id Update 2025 शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन (Geo referenced parcel data) आणि त्यावर घेतलेली पिके (DCS) ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाइन प्रणालीशी Application Programming Interface (API) द्वारे AgriStack ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त (जमाबंदी) तथा संचालक भूमीअभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer id Update 2025) साठी नोंदणी केलेली नाही. त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. यासाठी ग्राम कृषी विकास समिती आणि क्षत्रिय यंत्रणेची मदत घ्यावी.

WhatsApp Group Join Now

शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त (कृषी) यांचेद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment