Us Pachat Vyavasthapan 2025 ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास जमिनीच्या सुपीकता व सजीवितेसाठी उपयुक्त ठरते.

बहुतांश शेतकरी शेताच्या स्वच्छतेसाठी म्हणून पाचट जाळतात. पाचट हाताळण्यातील अडचणी, पाचटाने झाकले गेल्यास खोडव्याची उगवन कमी होणे आणि नंतर आंतरमशागतीमध्ये येणारे अडथळे यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळणे ही पारंपारिक पद्धती अधिक सोयीची वाटते.
कुणाचं रद्द होणार, कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड, जाणून घ्या सविस्तर;
मात्र, पाचटाचे आच्छादान जमिनीवर केल्यास होणारे फायदे यापेक्षा तुलनात्मक दृष्ट्या अधिक असल्याचे संशोधनात आढळले आहेत.

Us Pachat Vyavasthapan 2025 शेतातील पाचट लवकर कुजत का नाही?
उसाच्या पाचटांमधील कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर हे 122:1 असे असते. यातील कर्बाचे प्रमाण अधिक असले तरी नत्राची उपलब्धता कमी असल्याने जिवाणूंना अधिक वेळ लागतो. कर्बामुळे जिवाणूंना ऊर्जा मिळते, तर नत्रापासून प्रथिने मिळतात. जिवाणूंच्या चांगल्या वाढीसाठी पिकांच्या अवशेषातील कर्ब नत्र गुणोत्तर 24:1 असे असावे. असे गुणोत्तर शेणखत किंवा कंपोस्ट खतांमध्ये असते. त्यामुळे त्यामध्ये जिवाणूंचे प्रमाण अधिक असते.
Us Pachat Vyavasthapan 2025 शेतातील पाचट लवकर कुजण्यासाठी काय कराल?
- पाचटाचा जितका जास्त पृष्ठभाग जिवाणूंच्या संपर्कात येतो, तितका प्रक्रियेचा वेग वाढतो. त्यासाठी पाचटाची कुट्टी करून घेतल्यास फायद्याचे ठरते. त्यासाठी ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी यंत्र अलीकडे बाजारात उपलब्ध आहे. तसेच लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन केंद्राने तयार केलेले खोडवा व्यवस्थापन यंत्र सर्वोत्तम आहे.
- पाचट अधूनमधून भिजवत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी स्प्रिंकलर लावल्यास काम सोपे होते.
- पाचट कोरडे झाल्यास तुजवणारा जिवाणूंच्या क्रिया मंदावते.
- पाचटाचे कर्ब नत्र गुणोत्तर 24:1 च्या जवळ आणण्यासाठी उसाच्या पाचटातील नत्राचे प्रमाण वाढवले पाहिजे. त्यासाठी पाचटावर बाहेरून नत्र (युरिया) टाकावा.
- पाचट कुजवण्याचा वेग वाढवण्यासाठी शेणखत व जिवाणू कल्वर वापरावे.
- शेतातील पाचटाचा ढीग करून कुजवल्यास कमी वेळेत खत तयार होते. ढीगामध्ये तापमान वाढीसाठी वाव असतो. शेतातच कुजवायची असल्यास त्यास वेळ लागतो.
- महिन्यात पाचटाची उलटापालट करावी. जिवाणूंना आवश्यक ऑक्सिजन मिळतो. त्याचा फायदा होतो.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |