Us Galp 2025 सोलापूर : मागील वर्षी राज्यात व जिल्ह्यात पावसाच्या पडलेल्या खंडाचा यंदाच्या ऊस गाळपावर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना ऊस गाळपातून मिळणाऱ्या रकमेलाही 15 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे दिसत आहे. साखर कारखाने, ऊस तोडणी यंत्रणा तसेच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्रातील साखर उद्योगाचा देशभरात डंका आहे. मात्र, यावर्षी तशी परिस्थिती राहिली नसल्याचे दिसत आहे. कारण जानेवारी 2024 पासून उन्हाचा कडाका सुरू झाला होता. अगोदरच पाऊस कमी पडल्याने पाण्याअभावी ऊस क्षेत्र कमी झाले होते. कडक उन्हाळ्याच्या चटक्याने उसाच्या वाढीवर कमालीचा परिणाम झाला होता.
राज्यात उष्णतेचा पारा चाळीशीपार; सर्वाधिक तापमान कुठे? वाचा सविस्तर;
मात्र, 2024 च्या जून महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाला सुरुवात झाली. मात्र, सतत चार महिन्यांपेक्षा अधिक दिवस जोराचा पाऊस पडत राहिल्याने उसाची वाढ खुंटल्याचे सांगण्यात येते. अगोदरच ऊस क्षेत्र कमी व त्याही क्षेत्राची पुरेशी वाढ न झाल्याने वजनात मोठी घट झालेली दिसली. त्यामुळे सरलेल्या हंगामात एकरी उतारा कमी पडल्याने राज्यातच ऊस उत्पादक, ऊस तोडणी यंत्रणा तसेच साखर कारखान्यांना मोठा फटका बसला आहे.

जसा ऊस उत्पादकांना आर्थिक फटका बसला तसेच ऊस तोडणी यंत्रणेलाही पुरेसे काम मिळाले नसल्याने म्हणावा तितका रोजगार मिळाला नाही.
Us Galp 2025 राज्यातील गाळप मेट्रिक टन व रक्कम (कोटीत)
वर्ष | गाळप | रक्कम |
2020-21 | 1013.64 | 32,145 |
2021-22 | 1321.05 | 43,313 |
2022-23 | 1052.88 | 35,531 |
2023-24 | 1073.08 | 36,758 |
2024-25 | 847.79 | 21,043 |
Us Galp 2025 कमी व अधिक पाऊस पडल्याने ऊस उत्पादनावर सर्वाधिक फटका सोलापूर व धारशीव जिल्ह्याला बसल्याचे दिसत आहे. ऊस गाळप फारच कमी झाल्याने पैसाही कमीच मिळाला.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |