Ujani Dam 2025 पळसदेव : उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सिंचनाबरोबर पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने उजनी धरणातून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे.

सध्या उजनी धरणातील पाणीसाठा 20 टक्क्यांवर आला असून धरणात 11 टीएमसी उपयुक्त पाणीसाठी शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे पिकाला पाणी देण्याची वेळ येत आहे. त्यामुळे पिकाची तहान भागवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे.
उन्हाळ्यात गाई-म्हशींचे दूध घटते? उत्पादन घटू नये म्हणून काय करावे?
Ujani Dam 2025 सध्या उजनी धरणातून 2.950क्युसेकने कॅनॉलमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासोबत इतर पाणी योजना, बाष्पीभवन यामुळे उजनीतून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे.

धरणातून पाणीसाठा कमी झाल्याने पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी पाईप वाढवून पिकाला पाणी देण्यासाठी धडपड करत आहे.
सध्या पाणीसाठा अधिकच खालवल्याने आता पाणी देताना चारीचा आधार घेण्याची वेळ बळीराजावर आली आहे. दरवर्षी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या नशिबातच पाण्यासाठी संघर्ष लिहिला असल्यासचं मत अरविंद जगताप यांनी व्यक्त केला.
Ujani Dam 2025 ’11’ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक
धरणातून पाणीसाठा कमी झाल्याने पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी पाईप वाढवून पिकाला पाणी देण्यासाठी धडपड करत आहे.
Ujani Dam 2025 लाखो रुपये खर्च करण्याची शेतकऱ्यांवर वेळ!
- उजनी काठावरील धरणग्रस्त शेतकरी संघटित नसल्यामुळे राजकीय नेते मंडळी याचा फायदा घेऊन केवळ माताच राजकारण करून या भागातील शेतकऱ्यांचा मातापुरता वापर करून घेतात.
- मात्र, धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्यासाठी ठोस काम करत नाहीत. हेच परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी पाईप, केबल व चाऱ्या काढण्यासाठी शेतकऱ्याला लाखो रुपये खर्च करण्याची वेळ येत आहे.
- मूळ सिंचन आराखड्यात राखीव पाण्याची तरतूद आली तरी या भागातील शेतकरी पाण्याची मागणी करत नाहीत. पाणीपट्टी भरण्यास कमी पडत असल्यानं उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी आजपर्यंत राखीव ठेवता आले नाही.
“ 20 जुलै 2019 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व धरणातील पाण्याच्या वापराबाबत प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. त्यानुसार प्रथम पशुधन, पिण्यासाठी, आरोग्य व घरगुती वापरासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर कृषी (सिंचनाकरिता वापर) नंतर औद्योगिक वापर, पर्यावरण, करमणूक व नंतर इतर वापर या पद्धतीने पाण्याच्या वापराचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पाईपलाईन पूर्ण होईपर्यंत पिण्यासाठी पाणी द्यावे लागत आहे.- रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता “
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |