MahaDBT Portal 2025 कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. सध्या पोर्टलमध्ये काही सुधारणा सुरू असल्याने अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तथापि, 15 एप्रिल नंतर पोर्टल पूर्ववत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ करतो, आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनांचा साठी अर्ज सादर करण्याची सुविधा मिळते.
कुणाचं रद्द होणार, कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड, जाणून घ्या सविस्तर;
MahaDBT Portal 2025 नव्या आर्थिक वर्षात पोर्टलमध्ये सुधारणा!
- 2024-25 हे आर्थिक वर्ष 31 मार्च 2025 रोजी संपले. 1 एप्रिल पासून 2025-26 या नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे.

WhatsApp Group
Join Now
- नव्या आर्थिक वर्षात महाडीबीटी पोर्टल मध्ये काही तांत्रिक सुधारणा करण्यात येत आहेत, त्यामुळे अर्ज प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली गेली आहे.
- यासंबंधी शेतकऱ्यांसाठी पोर्टलवर सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
MahaDBT Portal 2025 पोर्टलवर उपलब्ध कृषी विभागाच्या योजना…
- महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
- जे 15 एप्रिल नंतर पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकरी नवीन नोंदणी सह विविध योजनांसाठी अर्ज करू शकतील. त्यानंतर शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळू शकेल.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |